Kunthalgiri Pedha : गोड बातमी ! आपल्या लाडक्या कुंथलगिरी पेढ्याला मिळणार जीआय मानांकन

सरमकुंडी येथील ग्रामस्थ, उत्पादक, व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
Kunthalgiri Pedha
Kunthalgiri Pedha esakal
Updated on

वाशी : महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही प्रसिद्ध असलेल्या सरमकुंडी फाटा (ता. वाशी) येथील कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन मिळणार आहे. जिओग्राफिकल इंडिकेट कार्यालयाकडून येथील पेढा उत्पादकांना याबाबतच्या मान्यतेचे पत्र लवकरच मिळणार आहे. येथील पेढ्याला भौगोलिक मान्यता मिळणार असल्याने उत्पादक, व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

धाराशिव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर १९७२ च्या दुष्काळावेळी सरमकुंडी येथील बापूराव गायकवाड यांनी प्रथम सरमकुंडी फाटा येथे पेढा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर हळूहळू सरमकुंडीसह परिसरातील काही तरुण खवा व पेढा उत्पादन व विक्री व्यावसायात आले. बापूराव गायकवाड यांनी लावलेल्या पेढा विक्रीच्या व्यवसायाच्या रोपट्याचे काही वर्षांतच वृटवृक्षात रूपांतर झाले. ‘कुंथलगिरी पेढा’ या नावाने प्रसिद्ध असलेला हा पेढा महाराष्ट्रासह अन्य राज्यांत प्रसिद्ध झाला. विविध देवस्थाने, विविध यात्रांमध्ये या पेढ्याला कायमच मोठी मागणी असते. दिवसेंदिवस ती वाढतीच आहे.

Kunthalgiri Pedha
Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास वीस वर्षे सक्तमजुरी

येथील उत्पादकांनी या पेढ्याला ‘जीआय टॅग’ मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव पाठवला होता. सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. कुंथलगिरी पेढ्याला ‘जीआय टॅग’ देत असल्याच संबंधित यंत्रणेने जाहीर केले आहे. याबाबत कळताच खवा व पेढा उत्पादकांत आनंदाचे वातावरण आहे.

Kunthalgiri Pedha
Crime: एकतर्फी प्रेमातून युवकाचं धक्कादायक कृत्य! अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

‘जीआय टॅग’ चे फायदे

भौगोलिक चिन्हांकन (जीआय टॅग) हे विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. संबंधित उत्पादनाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो. जीआय मानांकन हे एखादी वस्तू, पदार्थ, उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवाद्वितीय असल्याची पावती आहे. जीआय मानांकनप्राप्त उत्पादनांना कायदेशीर संरक्षण मिळते. मानांकनप्राप्त उत्पादनाच्या निर्यातीला कायदेशीर संरक्षणाखाली चालना मिळते. उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळते. जागतिक व्यापार संघटनेच्या इतर सदस्य देशांमध्ये कायदेशीर संरक्षण मिळविण्यास मदत होते.

कुंथलगिरी पेढ्याला जीआय मानांकन मिळणार असल्याने येथील पेढा देशपातळीवर पोचेल. त्याचा आनंद आहे. सरमकुंडी फाटा येथील हा मूळ दर्जेदार पेढा राज्यासह अन्य राज्यांत प्रसिद्ध आहे. मात्र अनेक ठिकाणी भेसळ पद्धतीने तयार केलेला पेढा ‘कुंथलगिरी’च्या नावाखाली विकला जातो. बाजारातील भेसळयुक्त खव्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दर्जेदार खवा, पेढा उत्पादन करणाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय अशा प्रकारांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. भेसळयुक्त उत्पादन विकणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

किरण हाके, पेढा व खवा उत्पादक व्यापारी, सरमकुंडी फाटा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com