esakal | गारांच्या पावसामुळे ज्वारी, गहू, केळीसह पानमळ्यांचे मोठे नुकसान 

बोलून बातमी शोधा

Haistorm Damaged Crops In Osmanabad

पाच दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे.

गारांच्या पावसामुळे ज्वारी, गहू, केळीसह पानमळ्यांचे मोठे नुकसान 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुरोरी (जि. उस्मानाबाद) : तुरोरीसह परिसरामध्ये सोमवारी (ता.१२) दुपारी साडेबारा ते दीडच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे शेतातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू तसेच केळी व पानमळ्याचे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण आहे. रविवारी (ता. ११) सायंकाळी सातच्या सुमारास चिंचकोट, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी, दगड धानोरा परिसरात जोरदार पाऊस पडला होता.

औरंगाबादेत कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक, तब्बल १४ हजार २५७ जण कोरोनामुक्त

सोमवारी दुपारी तुरोरी, मुळज, कुन्हाळी, तलमोड, कोळसूर, जगदाळवाडी, कराळी आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांसह मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंबा जमीनदोस्त झाला तर केळीच्या बागेसह पानमळ्यांचेही नुकसान झाले आहे.

संपादन - गणेश पिटेकर