उस्मानाबादचे 'मांझी'! समाजसेवेचे वेढ असणारे पंकज करतायत बोरी नदीचे खोलीकरण

osmanabad
osmanabad

नळदुर्ग ( उस्मानाबाद): तुळजापूर येथील पंकज शहाणे यांनी अर्ध्याहून आधिक तुळजापूर तालुक्यातीची जीवन वाहिणी असलेल्या बोरी नदीचे खोलीकरण करण्याचा चंग बांधला आहे. सध्या बोरी नदीच्या सुमारे बत्तीस किलोमीटर अंतरापैकी एक किलोमीटर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. हे काम काम ते स्वखर्चाने करत आहेत.

पंकज यांच्या आई सुषमा शहाणे यांनी पेन्शनची पंचवीस हजार रूपये रक्कम या कामासाठी मदत म्हणून दिली आहे. तसेच राहूल भोसले, मनोज झाडपीडे यांंनी प्रत्येकी दोन तासाचे जेसीबी भाड्याची रक्कम मदत म्हणून दिली आहे. पंकज शहाणे यांनी कपडा बँक, मनोरूग्णांची सेवा, लॉकडाऊन काळात जेवण पुरवणे, गरजू नागरिकांना अन्नधान्य कीट वाटप, विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, व्यायाम करण्याबाबत जनजागृती, रुग्णांनी व्यसनापासून दुर राहण्यासाठी प्रयत्न करतात.

पंकज शहाणे कपडा बँकेच्या उपक्रमातून गरजूना वापरण्यायोग्य कपडे मोफत  पुरवतात. आत्तापर्यंत त्यांनी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आनेक भटक्या विमुक्त समाजातील १४ हजार पेक्षा जास्त गरजूना कपडे वाटप केले आहेत. तसेच शहाणे यांनी आत्तापर्यंत नळदुर्ग खंडोबा मंदिर, तुळजापूर येथील  तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचे आंबाबाई मंदिर, गोवा समुद्र किनारा, रत्नागीरी, औसा,  लातूर, सोलापूर,  पंढरपूर, तुळजापूर येथील बसस्थानकांची स्वखर्चाने स्वच्छता केली आहे. तुळजापूर  येथील ऐतिहासिक विहीर (कुंड) स्वच्छ केली आहेत.

तुळजापूरसह परिसरातील तेरा मनोरूग्णांची स्वतः सेवा करून कायदेशीर मार्गाने या मनोरूग्णांना येरवडा येथे दाखल केले आहे. मागील वर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या काळात शहाणे यांनी १४२ दिवस तब्बल चौदा हजार जेवणाच्या थाळ्यांचे मोफत वाटप केले. तर याच काळात तुळजापूर येथील एक हजार चारशे कुटूबांना अन्नधान्य पुरवठा केला आहे. काही दिवसापूर्वीं तुळजापूर नगरपालिका हद्दीतील मोकळ्या भुखंडावर वाढलेले गाजर गवत काढून साफसफाई केली आहे. व्ययमाची आवड असलेल्या पंकज शहाणे यांनी तरूणांना व्ययम करा निर्व्यसनी रहा असा संदेश दिला आहे.

मार्च २०१७ मध्ये धुळवडीच्या दिवशी शहाणे दांपत्याने मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात  स्वच्छता अभियान राबवल्यानंतर दै.सकाळ ने वृत्त प्रसिद्ध केले होते यानंतर शहाणे यांच्या कामाची इतर प्रसार माध्यमांनीही दखल घेतल्याचे सांगून पंकज शहाणे यांनी दै.सकाळने माझ्या कामाची दखल घेवून प्रसिद्धी दिल्यानंतर काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे आवर्जून सांगत 'सकाळ'चे आभार मानले.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com