esakal | कौतुकास्पद! पंकज शहाणेंच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ; बोरी नदीचे खोलीकरण 5 किलोमीटर पूर्ण

बोलून बातमी शोधा

bori kholikaran}

नळदुर्ग येथे बोरी धरणात बोरी नदीतून पाणी जाते ही बाब लक्षात घेऊन श्री शहाणे यांनी आधी काम सुरू केले आणि इतरांना बोरी नदी खोली करणाबाबत माहिती दिली

कौतुकास्पद! पंकज शहाणेंच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ; बोरी नदीचे खोलीकरण 5 किलोमीटर पूर्ण
sakal_logo
By
ओंकार कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद): मागील काही दिवसांपूर्वी पंकज शहाणे हे चर्चेत आले होते ते त्यांच्या एका नव्या निश्चयाने, कारण त्यांनी जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यासाठी बोरी नदीचे खोलीकरण सुरु केले होते. विषेश म्हणजे यासाठी त्यांच्या आईने स्वतःच्या पेन्शनचे काही पैसे दिले होते. तसेच इतर काही लोकांनीही मदत केली होती. पण 'सकाळ'च्या बातमीनंतर आता शहाणे यांच्या कार्याला चांगला जोर आलेला दिसत आहे.

जिल्ह्यातील बोरी नदीचे खोलीकरण सुरू केलेल्या कामास नागरिकांनीही मागील 14 दिवसांत मोठा प्रतिसाद दाखविला असून सुमारे पाच किलोमीटर खोलीकरणाचे काम मंगळवारपर्यंत पूर्ण झालेले आहे. पंकज शहाणे यांनी ता.17 फेब्रुवारी पासून स्वतःजवळचे वीस हजार रुपये आणि आई सुषमा शंकरराव शहाणे यांच्या निवृत्ती वेतनाचे 25 हजार रूपये घालून बोरी तालुका तुळजापूर येथील बोरी धरणाच्या उगमापासून खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.

वीस हजारांसाठी पोलिस निरिक्षकानं 'लाज' काढली

सकाळी साडे नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत  खोलीकरणाचे काम दररोज चालू आहे. नळदुर्ग येथे बोरी धरणात बोरी नदीतून पाणी जाते ही बाब लक्षात घेऊन श्री शहाणे यांनी आधी काम सुरू केले आणि इतरांना बोरी नदी खोली करणाबाबत माहिती दिली. श्री शहाणे यांनी स्वतः जवळचे पैसे घातले आणि नंतर लोकसहभागातुन पुढे काम चालू ठेवले. सुमारे 7 कोटी लीटर पाणी साठेल असा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणावर खोलीकरण सध्या झालेले आहे. शेतकऱ्यांना या खोलीकरणाचा मोठा फायदा होईल.

गंगापूर साखर कारखाना प्रकरणातील आरोपी मोकाटच, कृष्णा डोणगावकरांचा आरोप

15 किलोमीटर पर्यत काम नेण्याचा संकल्प- 
पाच किलोमीटरचे काम झालेले आहे. अनेकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. बोरी नदी खोलीकरण करण्यासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अनेक नागरिक समोर आले. यामध्ये मनोज झाडपिडे (1800 ), राहुल भोसले (2100) , अॅड गिरीश लोहारीकर (1000), पंकज वाकळे (800) , आशिष राजदेव (10000), वध॔मान दुरूगकर (1600), अभिषेक कोरे (2200), सुषमा शहाणे (25000), अजीज भाई सय्यद (1600), प्रशांत संगपाळ(2100), गणेश हिप्परगेकर (800 ), सचिन जमदाडे (1000)  , सुमंत ठाकूर (1000), प्रवीण डांगे  (500),  सुनील व्यंकटराव चव्हाण (11000), विजयकुमार रुईकर (5000), संदीप चादरे (1000, सुरज जगदाळे( 5000), संजय मामा क्षीरसागर (1100) अशी मदत करण्यात आली आहे.