esakal | पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांची पोलिस स्टेशनवर दगडफेक; 2 पोलिस जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

dagadfek

घटना सोमवार (ता.पाच ) रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांची पोलिस स्टेशनवर दगडफेक; 2 पोलिस जखमी

sakal_logo
By
नेताजी नलवडे

वाशी (उस्मनाबाद): पारधी समाजाच्या जमावाने वाशी पोलिस स्टेशनवर अचानक केलेल्या दगडफेकीत पोलिस निरिक्षक उस्मान शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी परशुराम पवार, भागवत झोंबाडे जखमी झाल्याची घटना सोमवार (ता.पाच ) रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे.

पोलिस निरिक्षक उस्मान शेख व परशुराम पवार यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर भागवत झोंबाडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पकड वॉरंटमध्ये रमजा लाला काळे (रा. जोगेश्वरी पिढी पारा) यास एक एप्रिल रोजी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले होते .न्यायालयाने त्याला कोठडी दिली होती.

परिक्षाला जाणाऱ्या सौरभवर काळाचा घाला; अपघातात जागीच ठार

त्यानतंर दोन दिवस जेलमध्ये राहिलेनंतर त्याची तब्येत बिघडल्याने त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी  त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचे शव सोमवारी अम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आले. नंतर सदरील अम्ब्युलन्स घेऊन पारधी समजातील लोकांनी वाशी पोलीस ठाणे गाठत 100 जणांच्या जमावाने अचानकपणे दगडफेक सुरू केली.

तुळजाभवानी मातेचे मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद

यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ भूमचे पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी जखमींची भेट घेतली आहे.

loading image