esakal | अनधिकृतपणे पाणीवाटपाचा व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृतपणे पाणीवाटपाचा व्यवसाय

अनधिकृतपणे पाणीवाटपाचा व्यवसाय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शहरातील २१ प्लान्टना नोटिसा, अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

उस्मानाबाद - अनधिकृतपणे पाणीवाटप करणाऱ्या प्लान्टना नोटीस बजावण्यात आली आहे. हा व्यवसाय करताना कोणतेही नियम पाळले नसल्याचा ठपका ठेवून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. शहरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या प्लान्टची संख्या २१ असून, सर्व प्लान्टला नोटिस बजावण्यात आली आहे.

उन्हाळ्यात अनेक कार्यालये, तसेच लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम अशा विविध ठिकाणी थंड पाण्याचे जार घेतले जातात. या पाण्याबाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले असून जारचे पाणी खरेच स्वच्छ असते का, हे कोणीही सांगू शकत नाही; पण अगदी कमी पैशाची गुंतवणूक करून हा व्यवसाय उभा राहत असून, मागणी वाढल्याने प्लान्टची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने राजरोसपणे हा धंदा जोरात सुरू आहे. आता अन्न व औषध प्रशासनाने अशा व्यावसायिकांना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात आठ ते दहा दिवसांना पाणीपुरवठा होत असल्याने जारला नागरिकांतून मागणी वाढली आहे.

तसेच  सरकारी व खासगी कार्यालयांत दररोज पाण्याचे जार लागतात. त्यामुळे जिल्ह्यात हा व्यवसाय वाढला आहे. सरकारच्या पॅकेज्ड वॉटर नियमानुसार कोल्ड वॉटर प्लान्टधारकांनी पॅकेजिंग करून पाणी थंड करावे, असे निर्देश आहेत. प्लान्टधारकांच्या म्हणण्यानुसार पॅकेज्ड वॉटर व कोल्ड वॉटर व्यवसाय वेगळा आहे. अनामत रक्कम ठेवून २०-३० लिटरच्या जारसाठी ४० रुपये घेतले जात आहेत. दरम्यान, हा व्यवसाय करण्यासाठी सरकारची कोणतीही परवानगी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी असलेल्या अटी व नियम कठोर असल्याने एका वर्षात हा व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. कोल्ड वॉटरच्या व्यवसायाला नियम लावण्याबाबतच्या प्रस्तावावर फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्डने ऑथारिटी दिलेली नाही. त्यांना बीआयएसचा पॅकेज्ड वॉटर परवाना घ्यावा लागतो; मात्र अशा कोणत्याही प्लान्टधारकांनी हा परवाना घेतलेला नाही.

नोटिसा बजावलेले प्लान्ट
सार्थक एंटरप्रायजेस, (ज्ञानेश्‍वर मंदिराजवळ), श्री जल (सांजा नाका), देवकृपा ॲक्वा (माणिक चौक), सिनर्जी ॲक्वा (बार्शी रोड), ओम जल (हॉटेल सोनाई), लक्ष्मी ॲक्वा (एम.आय.डी.सी), मयूर जल (बालाजीनगर), मयूर जल (रामकृष्ण कॉलनी), सिद्धी ॲक्वा (भानुनगर), सनशाईन ॲक्वा (कोर्टाच्या मागे), ॲक्वा गार्ड (बालाजीनगर), साहिल ॲक्वा (गालिबनगर), गॅलेक्‍सी ॲक्वा (जुना उपळा रोड), ग्लोबल ॲक्वा (एम.आय.डी.सी.), गणेश ॲक्वा (बार्शी रोड), आरओ फ्रेश वॉटर (ताजमहल टॉकीज), इंडिया कूल वॉटर (खाजानगर), रॉयल ॲक्वा (गालिबनगर), हातलाई ॲक्वा (बार्शी रोड), स्टार गोल्ड ॲक्वा (वैराग रोड).

loading image
go to top