यंदा उस्मानाबाद जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांचे धुराडे पेटणार

नागवडे साखर कारखाना
नागवडे साखर कारखाना
Updated on
Summary

तुळजापूर तालुक्याच्या ऊस गाळप यंदा सोयीचे होणार आहे. गेली अनेक वर्षे येथील शेतकऱ्यांची ऊस गाळपाची परवड सुरू होती.

उस्मानाबाद : जिल्ह्यात Osmanabad ऊस गाळप Cane Crushing करणाऱ्या नवीन दोन कारखान्यांचे धुराडे यंदा पेटणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही कारखाने तुळजापूर Tuljapur तालुक्यात आहेत. त्यामुळे अतिरिक्त ऊसाची डोकेदुखी कमी होण्यास मदत होणार आहेत. जिल्ह्यात पुढील वर्षात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊसाला यंदाही चांगला दर मिळाला. त्यामुळे अनेक शेतकरी ऊसाकडे वळत आहेत. तालुक्यात बोरी धरणामुळे पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. या शिवाय छोट्या-मोठ्या साठवण तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. तालुक्यात यापूर्वी लोकमंगल आणि कंचेश्‍वर असे दोन साखर कारखाने Sugar Mill आहेत. आता नव्याने दोन कारखाने होत आहेत. सिद्धीविनायक परिवाराचे प्रमुख दत्ता कुलकर्णी यांनी गुळ पावडर (जागरी पावडर) कारखाना काटगाव येथे सुरू होत आहे. त्याची क्षमता ७०० टनाची आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपाचा प्रश्‍न सुटण्याचे संकेत मिळत आहेत. या शिवाय बारूळ भागात रुपामाता परिवाराचा दुसरा गुळपावडर (जागरी पावडर) कारखाना सुरू होत आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्याच्या ऊस गाळप यंदा सोयीचे होणार आहे. गेली अनेक वर्षे येथील शेतकऱ्यांची ऊस गाळपाची परवड सुरू होती. तालुक्यात कंचेश्‍वर आणि लोकमंगल अशी दोन साखर कारखाने असूनही परिसरातील शेतकऱ्यांना गाळपासाठी सोलापूर Solapur जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होते. प्रत्येक वर्षी शिल्लक ऊसाचा प्रश्‍न सतावत होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यातून येथील ऊसाची तोडणी करण्यासाठी कारखान्यांच्या टोळ्या येत होत्या. आता तालुक्यात दोन नवीन साखर कारखाने होत असून दोन्ही साखर कारखान्यांची धुराडी यंदा पेटणार आहे. याचा फायदा उस्मानाबाद लोहारा तालुक्यांनाही होणार आहे. Osmanabad News This Year Only Two Sugar Mills Run Their Crushing Season

नागवडे साखर कारखाना
'संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका मान्य नाही'

जिल्ह्यातील उद्योजक

गेली अनेक वर्षे जिल्ह्याबाहेरील उद्योजक येऊन येथे साखर कारखाना सुरू करीत होते. लोकमंगल तसेच कंचेश्‍वर तसे बाहेरच्या जिल्ह्यातील उद्योजकांचे साखर कारखाने आहेत. या शिवाय परंडा, भूम आणि उस्मानाबाद तालुक्यातही बाहेरच्या जिल्ह्यातील उद्योजकांनी साखर कारखाने सुरू केले. यंदा मात्र दोन्ही उद्योजक जिल्ह्यातील आहेत. रुपामाता परिवाराचे प्रमुखॲड. व्यंकटराव गुंड यांनी आतापर्यंत उस्मानाबाद तालुक्यात एक गुळपावडर साखर कारखाना सुरू केला आहे. आता नव्याने बारुळ येथे त्यांचा दुसरा साखर कारखाना सुरू करीत आहेत. त्याची पायाभरणी पूर्ण झाली आहे. तर दत्ता कुलकर्णी हे सिद्धीविनायक परिवाराचे असून त्यांनी कारखानदारीच्या क्षेत्रात प्रथमच पाऊल टाकले आहे.

Osmanabad News This Year Only Two Sugar Mills Run Their Crushing Season

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com