esakal | सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यकारी अध्यक्ष! जाणून घ्या बसवराज पाटलांचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Basavaraj Patil

उमरग्याचे सुपूत्र, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बसवराज माधवराव पाटील यांची दुसऱ्यांदा प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.​

सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश काँग्रेस समितीचा कार्यकारी अध्यक्ष! जाणून घ्या बसवराज पाटलांचा प्रवास

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी खांदेपालट झाल्याने काँग्रेसच्या हॉयकंमाडने राज्याच्या कार्यकारणीची निवड जाहीर केली आहे. उमरग्याचे सुपूत्र, माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार बसवराज माधवराव पाटील यांची दुसऱ्यांदा प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

दरम्यान पक्षाशी एकनिष्ठपणे राहून स्थानिक स्वराज्य संस्थेवर उस्मानाबादसह लातूर जिल्हयात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व ठेवण्यासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन श्री. पाटील यांना हायकंमाडने पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे. उमरगा, लोहारा तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात पक्ष वाढीसह कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी श्री. पाटील गेल्या तीन दशकांपासून यशस्वीपणे काम केले आहे. उमरगा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती.

विरोध बाजूला ठेवून एकाच व्यासपीठार मुंडे बहीण-भाऊ

शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचे व्यापक काम आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता मिळविण्यासाठी त्यांचे कौशल्य यशस्वी ठरत आले आहे. अनेक सामान्य कार्यकर्त्यांना पदाची संधी श्री. पाटील यांच्या माध्यमातुन मिळू शकली. उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर लातूर जिल्हातील औसा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी पकड निर्माण केली. सलग दोन टर्म ते या मतदारसंघातून निवडून आले. मतदारसंघात त्यांनी विकासाची भरीव कामगिरी केली.

मात्र ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या निवडणूकीत श्री. पाटील यांचा विजय रोखण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तत्कालिन स्वीय सहायक अभिमन्यू पवार यशस्वी ठरले. वास्तविकतः श्री. पाटील यांचा विजय रोखण्यासाठी गनिमी कावा झाला, तरीही ते मागे हटले नाहीत. पक्षाची ध्येय -धोरण सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील राहिले. श्री. पाटील माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे समर्थक आहेत.

महागाईविरोधात शिवसेनेच्या वतीने उदगीरात रास्तारोको आंदोलन

विठ्ठलसाई साखर कारखाना परिसरात माजी पंतप्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी सोनिया गांधी यांची उपास्थिती होती. शिवाय निवडणूकी दरम्यान सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या  भव्य जाहिर सभेचे यशस्वी नियोजन श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. संघटन कौशल्याची हातोटी, पक्षासाठी केलेल्या चांगल्या कामामुळे श्री. पाटील यांना काँग्रेसच्या हायकंमाडने पुन्हा प्रदेश समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षासाठी चांगली फलश्रुती मिळेल.

(edited by- pramod sarawale)

loading image