Osmanabad Protest: उपोषणाची दखल न घेतल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Protest

Osmanabad Protest: उपोषणाची दखल न घेतल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या बस

उस्मानाबाद : ठाकरे गटाचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे मागच्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी उपोषण करत आहेत. या उपोषणाची दखल न घेतल्याने ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी विविध भागांतील एसटी बसची तोडफोड केली आहे. तर या आंदोलनाला आता वेगळं वळण लागलं असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

(Osmanabad Kailas Patil Protest For Farmer)

दरम्यान, कार्यकर्त्यांकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आलीये. या घटनेनंतर आता या आंदोलनाला कोणते वळण मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर काल रात्री कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागांत केलेल्या बसच्या तोडफोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

काय आहे आमदार कैलास पाटील यांची मागणी?

आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जोपर्यंत पिक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यांचे हे उपोषण गेल्या ५ दिवसांपासून सुरू असून सरकारचे याकडे लक्ष वेधण्याचे अनेक प्रयत्न केले गेले पण याकडे सरकारने लक्ष न दिल्याने कार्यकर्त्यांनी आता बसची तोडफोड करण्यास सुरूवात केलीये.