esakal | उमरग्यात गरजूंसाठी शिवभोजन थाळी
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा : शिवभोजन थाळी उपक्रमाचा प्रारंभ करताना विठ्ठल उदमले, ज्ञानराज चौगुले, संजय पवार, किरण गायकवाड, प्रकाश पाटील, बाबूराव शहापुरे आदी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासात अडकलेले, विविध कामे बंद असल्याने आर्थिक अडचणीत असलेले कामगार, कष्टकरी, तसेच बाहेरगावचे विद्यार्थी उपाशीपोटी राहू नये म्हणून शिवभोजन थाळी योजना तालुकास्तरावर सुरवात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.

उमरग्यात गरजूंसाठी शिवभोजन थाळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि. उस्मानाबाद) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वत्र स्मशानकळा आली आहे. दररोजच्या उदरनिर्वाहाची साधने बंद पडली आहेत. तालुक्यासह परराज्यातून येणाऱ्यांसाठी सोमवारी (ता. ३०) शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील राधाकृष्ण हॉटेल येथे शिवभोजन थाळी प्रकल्पाचा प्रारंभ उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.

तहसीलदार संजय पवार, युवानेते किरण गायकवाड, मुख्याधिकारी प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, माजी नगरसेवक विवेक हराळकर, नायब तहसीलदार विलास तरंगे, डॉ. रोहन काळे, पोलिस निरीक्षक माधव गुंडिले, शिवभोजन चालक अजित अंबुलगे, बाबासाहेब अंबुलगे, नगरसेवक संतोष सगर, बळी सुरवसे, सुधाकर पाटील, संदिप चौगुले, शरद पवार आदींची या वेळी उपस्थित होते. शासनाच्या या उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या काळात गरजू व भुकेलेल्या नागरिकांना शिवभोजनाचा आधार मिळणार आहे.

वाचा : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एकासह चार जनावरांचा मृत्यू, चाकूर तालुक्यातील घटना

शिवभोजन सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत प्रतिथाळी पाच रुपये दराने तीन महिने शिवभोजन सुरु राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासात अडकलेले, विविध कामे बंद असल्याने आर्थिक अडचणीत असलेले कामगार, कष्टकरी, तसेच बाहेरगावचे विद्यार्थी उपाशीपोटी राहू नये म्हणून शिवभोजन थाळी योजना तालुकास्तरावर सुरवात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जे स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही, त्यांना शिवभोजनाचा लाभ घेण्यासाठी हा उपक्रम शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आला आहे. या संदर्भातील माहितीही व्यापक स्वरूपात व्हावी जेणेकरुन या योजनेचा फायदा अडचणीत असलेल्या अधिक लोकांना होईल. हॉटेलमध्ये एकाच वेळी गर्दी होऊ नये याचीही काळजी लाभधारकांना घ्यावी लागेल. या ठिकाणी प्रशासकीय, पोलिस यंत्रणेची आवश्यकता भासल्यास मदत घेण्यात घेईल. 
- आमदार ज्ञानराज चौगुले