उस्मानाबाद मध्ये सोयाबीनला मिळणार २५ टक्के आगाऊ भरपाई

शेतकर्‍यांतुन समाधान व्यक्त
सोयाबीनला मिळणार २५ टक्के आगाऊ भरपाई
सोयाबीनला मिळणार २५ टक्के आगाऊ भरपाईsakal
Updated on

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असुन, २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याची अधिसूचना विमा कंपनीस निर्गमित केली आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकर्‍यांतुन समाधान व्यक्त होत आहे.

सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसात मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या संभाव्य उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनात ५० टक्कापेक्षा अधिक घट अपेक्षित असल्यास एकूण अंदाजित पीकविमा रकमेच्या २५ टक्के रक्कम आगाऊ पीकविमा देण्याची तरतूद आहे. त्याच तरतुदीच्या आधारे दिलेल्या वेळेत कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीकविमा देण्याचे पीकविमा कंपनीला आदेश द्यावेत अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांच्या समवेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांना केली होती.

सोयाबीनला मिळणार २५ टक्के आगाऊ भरपाई
शिवसेनेत होणार मोठा स्फोट? अनेक पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत

या मागणीला सकारात्मकता दर्शवीत जिल्ह्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी व भूम, परंडा वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना मुग, उडीद, मका, बाजरी, तूर पिकांसाठी २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी पीकविमा कंपनीला दिल्या. रात्री उशीरा त्याची अधिसूचनाही निर्गमित करण्यात आल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com