
तालुक्यात नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली असून परतीचा पाऊस जास्त काळ राहिल्यामुळे सध्या तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. तुरीचे उभे पीक जागीच वाळून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चाकूर (लातूर) : परतीचा पाऊस जास्त काळ राहिल्यामुळे हलक्या जमिनीतील तुरीच्या पिकावर मर रोगाचा प्रार्दुभाव पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले. तसेच यासाठी शुक्रवारी (ता.१८) सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी संचालकांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली.
हे ही वाचा : शासनमान्य उदयोजकता विकास केंद्र नावापुरतेच ; बेरोजगारीचा प्रश्न कायम
तालुक्यात नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली असून परतीचा पाऊस जास्त काळ राहिल्यामुळे सध्या तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झालेला आहे. तुरीचे उभे पीक जागीच वाळून जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी भूजंग पवार यांनी या तुरीच्या पिकाचे नमुने कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञाकडे तपासणीसाठी पाठविले होते. जास्त काळ झालेल्या पावसामुळे हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांना बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाला असल्याचा अहवाल शास्त्रज्ञांनी दिला आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. पुणे येथील कृषी संचालक (विस्तार ) विकास पाटील, टी. एन. जगताप, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अरुण गुट्टे, संदीप देशमुख, श्री. तिर्थकर, तालुका कृषी अधिकारी भूजंग पवार यांनी तालूक्यातील आष्टा, महाळंग्रा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसान झालेल्या तुरीची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकाचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
संपादन - सुस्मिता वडतिले