11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश
Latur News: लातूर विभागात अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ७ जुलै आहे.
लातूर : इयत्ता अकरावीसाठी यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून याअंतर्गत आजवर लातूर विभागातील सुमारे ३२ हजार ५६७ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला आहे.