
लातूर : इयत्ता अकरावीसाठी आठ दिवसांच्या कालावधीत लातूर विभागातील ३२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोमवार (ता. सात) पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यामुळे आता दुसऱ्या फेरीकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे.