vaidyanath jyotirlinga temple
sakal
परळी वैजनाथ - यंदाच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांचा जनसागर उसळला. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ महाराज की जय, च्या जय घोषाने मंदिर परिसर दनाणून गेला. 'दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, धो, धो पाऊस पडू दे', म्हणून अनेक भाविकांनी दर्शनावेळी प्रभु वैद्यनाथाला साकडे घातले.
गेल्या दोन दिवसात सुमारे तीन लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले रविवारी सुट्टी असल्याने भाविकांची मोठी गर्दी मंदिरात होती. एकादशी व सोमवार एकाच दिवशी आल्याने सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखावर भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले. सोमवारी सायंकाळीही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.