Beed Hospital : खाटा अपुऱ्या, रूग्णांवर सतरंजीवर टाकून उपचार
Bed Crisis : बीड जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग आणि शस्त्रक्रिया विभागात खाटांची कमतरता असल्याने अपघाती रुग्णांना जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहेत. ही स्थिती रुग्णांसाठी त्रासदायक तर आहेच, पण वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरही ताण निर्माण करते.
बीड : जिल्हा रुग्णालय येथील अस्थिरोग व शल्यचिकित्सा वॉर्ड एकत्र असल्यामुळे रुग्णांवर तातडीची उपचार व्यवस्था अनेकदा कोलमडत आहे. अपघातग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढल्यास खाटा कमी पडतात आणि रुग्णांवर जमिनीवर सतरंजी टाकून उपचार केले जातात.