

From Bramhgaon to Limgaon: List of Affected Villages Grows as Police Struggle for Leads
Sakal
पाचोड : गेल्या तीन महिन्यांपासून अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांना आपले ‘लक्ष्य’ बनवत विहिरी व कुपनलिकांवरील विद्युत मोटारी तसेच सौर ऊर्जेच्या केबलची चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. विहिरींमध्ये पाणी असूनही केबल व पंपाअभावी पिकांची होरपळ होत आहे. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही पोलिसांना चोऱ्यांवर नियंत्रण मिळवता आले नसल्याने आता गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.