aayush rodage and shyam rodage
sakal
पाचोड - जन्मदात्या निर्दयी पित्याने वडापाव व चॉकलेटचे आमिष दाखवून नव्या स्कूटीवर बसवून दोन चिमुकल्या मुलांना सोमवारी (ता. १६) जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्यानंतर तब्बल ४८ तासांनंतर आयुष उर्फ आर्यन सोमनाथ उर्फ परमेश्वर रोडगे या सात वर्षीय बालकाचा मृतदेह बुधवारी (ता .१८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास डाव्या कालव्याच्या इंदेगाव - ब्रम्हगाव शिवारात सापडून आला तर दुसरा बालक श्याम उर्फ कार्तिक रोडगे (वय पाच) याचा मृतदेह तब्बल तिन दिवसानंतर गुरुवारी (ता. १९) डाव्या कालव्यात अकरा वाजेच्या सुमारास टाकळी अंबड शिवारातील साखळी क्र१० जवळ कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना सापडून आला असून या घटनेने परिसरात संताप, दुःख आणि हळहळ व्यक्त होत आहे.