

Pachod police take strict action against youths involved in DJ violence and bike burning
Sakal
पाचोड : वाढदिवसाला डिजे वाजविण्यास मज्जाव करणाऱ्याचा मनात रोष धरून गुरुवारी (ता.२५) डिजेच्या निनादात संबंधिताच्या दुचाकी व अन्य साहीत्य एकत्रित करून पेटविणाऱ्या बारा तरुणांपैकी चार जणांची शनिवारी (ता.२७) पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी पैठण चौक ते पोलिस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढल्याने निष्कारण दहशत माजविणाऱ्यावर पोलिसांची जरब बसल्याचे पाहवयास मिळते.