Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

अनेक दिवसांपासुन अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांना आपले 'लक्ष्य' बनवून विहिरी व कुपनलीकेवरील विद्युत मोटारी चोरण्याचा सपाटा लावला आहे.
Electric Pump Cables Stolen

Electric Pump Cables Stolen

sakal

Updated on

पाचोड - अनेक दिवसांपासुन अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांना आपले 'लक्ष्य' बनवून विहिरी व कुपनलीकेवरील विद्युत मोटारी चोरण्याचा सपाटा लावला असला तरी गुरुवारी (ता.२६) मध्यरात्री चोरट्यांनी मात्र चक्क दोनशेच्यावर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल चोरून नेत ते एका ठिकाणी संकलित करून त्यांस जाळून त्यातील कॉपर (तांब्या)ची तार नेल्याची अजब घटना पाचोड (ता. पैठण) पोलिस ठाण्यांतर्गत गावांत घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com