

Police Officer Attacked at Pachod Toll Plaza Eight Suspects Detained After CCTV Footage Investigation Into Toll Dispute
esakal
-हबीबखान पठाण
पाचोड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता.पैठण) जवळील भोकरवाडी टोलनाक्यावर शनिवारी (ता.२२) रात्री टोल भरण्यावरून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यासंबंधी पाचोड व अंबड पोलिसांनी 'सीसीटीव्ही'च्या छायाचित्रणावरून आठ संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना रविवारी (ता.२३) ताब्यात घेतले.