पित्याच्या मृत्यूनंतर भोगाव्या लागत आहेत वेदना

tenshion.jpeg
tenshion.jpeg


घोगरी, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः वडिलांचे छायाछत्र हरवून जवळपास दहावा दिवस उजाडला, लॉकडाउनमुळे पोटची मुले अजूनही घराकडे परतली नाही. घरी आई एकटीच असल्याने पुढील इतर क्रियाक्रम कोणी करावे? हा प्रश्न या कुटुंबीयांना भेडसावत आहे. खरेच नियतीने या कुटुंबाप्रती असा कसा ‘खेळ मांडला’, असे म्हणून गावातील नातेवाईक अश्रू ढळताना दिसत आहेत.

घोगरी (ता. हदगाव) येथील मयत प्रकाश जाधव (वय ४४) हे मजूरदार असून या परिसरात, सततच्या होत असलेल्या नापिकीमुळे, गावात रोजगार मिळेनासा झाल्याने, त्यांनी रोजंदारीसाठी बाहेर जाण्याचे ठरविले. एकाच्या मदतीने हे संपूर्ण कुटुंब गेल्या तीन - चार वर्षांपासून पुणे येथे कामानिमित्त गेले. घरातील इतर सर्व सदस्य, मिळेल ती मजुरी करून आपली उपजीविका भागवत असत. त्यातच कुटुंबप्रमुख अण्णा हे शहरातील वातावरणाचा बद्दल सहन होत नसल्याने ते वेळोवेळी बिमार पडत असत. यामुळे पुणे शहरात असल्याने त्यांनी गावाकडे येऊन खासगी दवाखान्यात उपचार सुरू केला. याच दरम्यान त्यांची दोन मुले पुणे येथील कंपनीत राहून त्यांचा दवाखान्याचा खर्च भागवत असत. गेल्या महिन्यापासून त्यांची प्रकृती अधिकच खालावलीने. पण याच दरम्यान संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने, आटोक्यात आणण्यासाठी, लॉगडाउन व संचारबंदी सर्वत्र लागू करण्यात आली.


यामुळे दोन्ही मुले व इतर नातेवाइकांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. परंतु, लॉकडाउन प्रक्रिया पालन करण्यासाठी व काटेकोरपणे बंदोबस्त करण्यात आल्याने या कुटुंबीयांना घराकडे येता आले नाही. आणि त्यातच सोमवारी (ता. सहा) सदर व्यक्तीचे निधन झाले. दोन्ही मुले व इतर नातलगांशिवाय सोशल डिस्टन्सचे पालन करून मोजक्याच नातेवाइकांकडून अंतयात्रा उरकून घेण्यात आली. वडिलांची छत्रछाया हरवूनही जवळपास दहावा दिवस उजाडला, अजूनही सर्वत्र लॉकडाउन स्थिती कायम आहे. या कुटुंबीयांना अजूनही गावाकडे येणे मुश्कील झाले आहे. त्यातच घरी आई एकटीच असल्याने व इतर क्रियाक्रम विधी (तेरवी) जवळ आली असूनही आता कोण करणार? असा गहन प्रश्न या कुटुंबीयांपुढे निर्माण झाला आहे. ‘नियतीने असा कसा खेळ मांडला’ या कुटुंबीयांची झालेली ताटातूट, वडिलांचे शेवटचे दर्शनही यांना घेता येईना? यामुळे कसा ईश्वराचा खेळ निराळा, असे म्हणून संपूर्ण कुटुंबीय ईश्वराला दोष देऊन नयनी अश्रू ढाळताना दिसत आहे. शासनाने या कुटुंबीयांवर झालेला आघात आणि यातून सावरण्यासाठी पुणे येथे अडकलेल्या त्या दोन्ही मुलास व त्यांच्या नातेवाइकास, गावाकडे आणण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी या कुटुंबीयांची मागणी आहे.

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन होण्याने किमान १४ तारखेला तरी लॉक डाऊन थोड्याफार प्रमाणात का होईना सिथील होऊन बाहेरगावी अडकलेल्या मजूरदारास गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल या आशेवर आम्ही आजवर होतो. परंतु पुन्हा लॉकडाऊन तारीख वाढल्याने आमची घोर निराशा झाली आहे. सख्या मेहुण्याच्या तेरवीसाठी जाण्याचे भाग्य आमच्या नशिबी नसल्याने दुःख होत आहे.
- अंबादास जाधव, नातेवाईक, घोगरी.

 

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने ‘कंपनीत’ ओव्हर टाईम काम करून, वडिलांच्या उपचारासाठी लागणारा खर्च आम्ही दोघे भाऊ आजवर भागवीत होतो. परंतु नियतीने काही आमचा पिच्छा सोडला नाही, एवढा खर्च करूनही वडीलाचे निधन झाल्याचे समजूनही, लॉगडाऊन मुळे आम्ही अंत्यविधीला जाऊ शकलो नाही. याची खंत वाटत आहे. निदान तेरवीला जाता आले तरी मनाला समाधान लावणार आहे.
- किशन जाधव, शंतनू जाधव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com