Painganga River Barrage: पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण ; २०२ कोटींच्या प्रकल्पामुळे भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्याची आशा

Kinwat Water Project : किनवट शहराजवळील पैनगंगा नदीवरील २०२ कोटींच्या उच्च पातळी बंधाऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी मोठा पाणीसाठा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
Construction of the ₹202 crore Painganga River barrage near Kinwat is nearing completion.

Construction of the ₹202 crore Painganga River barrage near Kinwat is nearing completion.

esakal

Updated on: 

किनवट: किनवट शहरासह परिसरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घडामोड समोर आली आहे. पैनगंगा नदीवरील नवनिर्मित उच्च पातळी बंधाऱ्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. परतीचा पाऊस झाल्यास बंधाऱ्यात गेट बसवून पाणी अडविण्याची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पंकज गावंडे यांनी दिली आहे.

Loading content, please wait...