Paithan News : नाथसागरात १०.६७ टक्के पाणीसाठा

जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाला मराठवाड्याची जीवनदायिनी मानली जाते. या धरणात यंदा पावसाअभावी पाणी येवु शकले नाही.
Nathsagar Dam Water
Nathsagar Dam WaterSakal

पैठण - जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाला मराठवाड्याची जीवनदायिनी मानली जाते. या धरणात यंदा पावसाअभावी पाणी येवु शकले नाही. त्यामुळे नाथसागर धरणात केवळ १०.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

परिणामी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा, चिकलठाणा,वाळुज व पैठण या चार एमआयडीसी मधील उद्योजक धास्तावले आहेत. या एमआयडीसीसाठी दररोज ०.२९० दशलक्ष घन मीटर म्हणजे दररोज तीन‌ कोटी लिटर पाण्याच्या वापरावर संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

धरणातुन छत्रपती संभाजीनगर सह नगर जिल्ह्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व , उद्योगांची तहान धरणातुन भागविली जाते.

यासाठी वाळुज, चिकलठाणा , शेंद्रा ( छत्रपती संभाजीनगर) व पैठण या एम आयडीसीला नाथसागरातुन स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी पर्जन्यमानाने नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. परिणामी नाथसागर धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने वाळुज,शेंद्रा , चिकलठाणा व पैठण एमआयडीसीतील उद्योजक धास्तावले आहे.

नाथसागर धरणाची एकूण क्षमता १०२ टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास सहसा पाण्याची समस्या निर्माण होत नाही. यंदा एप्रिलमध्ये हाच पाणीसाठा १०टक्क्यांपर्यंत आला आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची, शेतीची तहान वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीसाठ्याचा अंदाज पाहता एमआयडीसींना केवळ महिनाभरच पाणीपुरवठा होण्याची भीती कारखादारातुन व्यक्त केली जात आहे.

अपुऱ्या पावसाअभावी यंदा मार्च/एप्रिलमध्येच नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला असतानाच संभाव्य पाणीटंचाईमुळे एमआयडीसीतील उद्योजक चांगलेच धास्तावलेले दिसत आहे. सध्याचा पाणीसाठा औद्योगिक पाहता क्षेत्राला कसाबसा महिनाभर सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर मात्र पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होणार आहे. यासाठी शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संभाव्य पाणीसंकटाला सामोरे जाण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. दरम्यान, शिल्लक राहणाऱ्या पाणीसाठ्यातून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.परंतु पाणी पातळी अधिक खालावत गेली तर मात्र या एमआयडीसीचे नियोजन पूर्णपणे कोलमडणार आहे.

शेकडो टँकरने पाणी विकत घेतले तरी एमआयडीसीतील काही मोठ्या प्रकल्पांची गरज पूर्ण होऊ शकणार नाही.त्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा खंडित होऊन अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. याची शासनाने त्वरीत दखल घेऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

पाणीसाठ्याचे १५ मे नंतरच चित्र स्पष्ट!

छत्रपती संभाजीनगर,पैठण, वाळुज व शेंद्रा एमआयडीसीला दररोज ०.२९० दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. इतर वेळी नाथसागर धरण पूर्ण भरल्यास ऑगस्टपर्यंत उद्योगांच्या पाण्याची नाथसागर धरणातुन गरज पूर्ण होते; मात्र यंदा पावसाअभावी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यामुळे पाणीसाठा एप्रिलमध्येच खालावण्यास सुरुवात झाली आहे. सध्या उद्योगांची पाण्याची गरज पूर्ण होईल एवढा नाथसागरात पाणीसाठा आहे; मात्र आणखी पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत नेमक्या पाणीसाठ्याचे गणित १५ मे नंतरच स्पष्ट होणार आहे.

जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणाची पाण्याची पातळीत घट होत असल्याने पाणीसाठा १०.६७ टक्क्यांवर आला आहे. यापुढे दिवसेंदिवस पाणी साठ्यात लक्षणीय घट होणार आहे. त्यामुळे पाणी संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक घटकाची आहे.यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करावा.

- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com