

Paithan Highway Accident: Two-Wheeler Rider Dies in Car Collision Near Kaudgaon
Sakal
रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कौडगावलगत शनिवारी (ता. २९) भीषण अपघात झाला. हॉटेलसमोर चारचाकी आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बाप्पासाहेब आणजोबा दिंडे (वय २७, रा. दिंडेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे मृताचे नाव आहे. या घटनेने महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.