Sandipan Bhumre
Sandipan Bhumresakal

Sandipan Bhumre : मंत्री संदीपान भुमरेंच्या विरोधात भाजपमध्ये नाराजी

पैठण विधानसभा मतदार संघात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Summary

पैठण विधानसभा मतदार संघात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पैठण - पैठण विधानसभा मतदार संघात पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ज्या मतदार संघात बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचा आमदार आहे, त्या ठिकाणी शिंदे सेनेला विविध योजनांच्या विकास निधीतून ६० टक्के निधी तर जेथे भाजपचा आमदार आहे, त्या ठिकाणी ४० टक्के निधी असा पक्ष पातळीवर फॉर्म्युला आहे. पण, पैठण मतदार संघात एक टक्काही निधी भाजपला देण्यात आला नाही.

या प्रकारामुळे मंत्री भुमरे यांनी पक्षश्रेष्ठींच्या फॉर्म्युल्याला हरताळ फासला असल्याचे बोलले जात आहे. संदीपान भुमरे यांना भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा मंत्री मंडळात स्थान देवून कॅबिनेट मंत्री करून रोहयो व फलोत्पादन हे मंत्री पद दिले. यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद निवडीचा प्रश्न पुढे आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी निवड करुन संधी दिली.

या सर्व घडामोडी होत असताना मतदार संघात भाजपला विकास निधीत ४० टक्के वाटा तर पालकमंत्री भुमरे यांना ६० टक्के वाटा असा फॉर्म्युला असा ठरला. परंतु, भुमरे पालकमंत्री होताच हा फॉर्म्युला विसरुन गेले, त्यांनी सर्वच निधी गिळंकृत करुन बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह काही ठराविक कंत्राटदारांच्या घशात घातला.

यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून, काही कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंत्री भुमरे यांनी औरंगाबाद येथे सुरु केलेल्या संपर्क कार्यालय आम जनतेतील एकही सर्व सामान्य माणूस दिसत नसून, तेथे फक्त समर्थक व कंत्राटदारांचाच गराडा दिसतो. भाजप कार्यकर्त्यांना ४० टक्केच्या वाट्यातून नाकारल्यामुळे पैठण मतदार संघातील भाजपचा एकही कार्यकर्ता व पदाधिकारी या संपर्क कार्यालयात दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com