Success Story : पैठण तालुक्यातील धरणग्रस्त तरुण संकेत भागवतची कोकणात 'जमीन मोजणीदार' पदावर झेप

बालपणी वडिलांचे छत्र हरवूनही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर संकेत भागवतची ‘जमीन मोजणीदार’ पदावर निवड; ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
After losing his father in childhood, Sanket Bhagwat from Dhakephal overcame hardships through determination and secured a Land Surveyor post in the Konkan Land Records Department, inspiring many with his success.

Sakal

Updated on

लोहगाव (ता. पैठण) : बालपणीच वडिलांचे छत्र हरपले, पाठीशी संकटांचा डोंगर असतानाही जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पग्रस्त ढाकेफळ येथील तरुण संकेत संभाजी भागवत याने स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महसूल व वन विभागांतर्गत भूमी अभिलेख कोकण विभागाच्या मालवण येथे 'जमीन मोजणीदार' (भूकर मापक) या पदावर त्याची निवड झाली असून, या यशामुळे ग्रामीण भागातील संघर्ष करणाऱ्या युवकांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com