

Farm Road Dispute In Paithan Farmers Begin Hunger Strike After Two Years As Revenue Offices Fail To Provide Justice
esakal
-चंद्रकांत तारु
पैठण : शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळावा म्हणून शेतकऱ्याने तहसील कार्यालयासह संबंधित सर्व महसूल कार्यालयांत नियमानुसार अर्ज दाखल करुनही त्यांच्या अर्जाची कुणीच दखल न घेतल्याने रांजनगाव दांडगा (ता.पैठण) येथील शेतकरी भावंडांनी पैठण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवार (ता.१८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.