Pomegranate Disease Maharashtra : गेवराई मर्दा येथील 'तेल्या' रोगाने हतबल शेतकऱ्यांने; ४०० डाळींबाची झाडे जेसीबीने जमीनदोस्त

पैठण तालुक्यात 'तेल्या' रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेवराई मर्दा येथील शेतकरी ज्ञानदेव सांगळे यांनी लाखो रुपयांचा खर्च करूनही रोग नियंत्रणात न आल्याने तब्बल 400 डाळिंबाची झाडे जेसीबीने जमीनदोस्त केली.
Paithan Gevarai Marda farmer destroys 400 pomegranate trees with JCB due to oily disease outbreak and crop loss

Paithan Gevarai Marda farmer destroys 400 pomegranate trees with JCB due to oily disease outbreak and crop loss

Sakal

Updated on

मुनाफ मुमताज आजीज शेख

आडूळ : पैठण तालुक्यात डाळींब बागांवर 'तेल्या' रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, उत्पादनावर झालेल्या गंभीर परिणामामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या नैराश्यातून गेवराई मर्दा येथील एका शेतकऱ्याने तब्बल ४०० डाळींबाच्या झाडांवर जेसीबी फिरवून अनेक वर्षांची मेहनत एका दिवसात उद्ध्वस्त केली. या घटनेमुळे परिसरातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com