An AI-generated image depicting the crowd of patients at a government hospital.
sakal
पैठण: परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डेंगी, चिकुनगुन्या आणि मलेरियासारख्या डासांमुळे होणाऱ्या कीटकजन्य आजारांसोबतच सर्दी, खोकला, अंगदुखी व तीव्र तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्णालयांत दाखल होत आहेत.
शहरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याकडे बिलकूल दुर्लक्ष करू नये, असा धोक्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे