

Thieves Abandon Vehicle After Being Chased
Sakal
पाचोड : रस्त्यालगत महावितरणचे काम सुरू असल्याचे पाहून अज्ञात चार - पाच चोरट्यांनी पाळत ठेवून कामाच्या ठिकाणी असणारी ॲल्युमिनीयम ची तार ओमनी कारमध्ये भरून चोरून नेत असताना ग्रामस्थांनी चोरट्याचा पाठलाग सुरू केला. आपला ग्रामस्थ पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच चोरटे कार सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना केकत जळगाव (ता.पैठण) शिवारात मंगळवारी (ता.१६) मध्यरात्री घडली.