

Agriculture Department Raids Fertilizer Shops in Paithan Following Complaints
Sakal
पाचोड : पैठण तालुक्यात सर्वत्र कृषी सेवा केंद्रावर मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध असतांनाही केंद्रचालक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढया दराने युरियाची विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावरून कृषी विभागाच्या वतीने आडूळ व पाचोड येथील कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली. यांत एका दुकानावर कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला.