Paithan Crime News: गुप्तधनाच्या आमिषाने सराफाला वडजी शिवारात नेऊन दहा लाखांची लूट; पाच जणांसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा

गुप्तधनाच्या सोन्याच्या टिकल्यांचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील सराफा व्यापाऱ्याला वडजी शिवारात बोलावून हातपाय बांधून मारहाण करत तब्बल दहा लाखांची रोकड लुटण्याची धक्कादायक घटना
Bullion trader robbed of ₹10 lakh after being lured to Paithan with a promise of hidden gold.

Bullion trader robbed of ₹10 lakh after being lured to Paithan with a promise of hidden gold.

esakal
Updated on

पाचोड : सोन्याच्या टिकल्या (गुप्तधन) विक्री करण्याचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील एका सराफा व्यावसायिकास वडजी (ता.पैठण) परिसरात बोलावून घेतल्यानंतर त्याला मारहाण करून हात बांधून त्याच्याकडील तब्बल दहा लाख रुपये रोख रक्कम जबरीने लुटल्याची घटना मंगळवारी (ता. १५) घडली असून या प्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी गुरुवारी (ता.१७) पाच जणांसह दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास गजाआड करुन दहा लाखाची रोकड जप्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com