Paithan Sugar Factory: ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पैठणमधील रेणुकादेवी साखर कारखाना बंद

Paithan Sugar Factory Shut Amid Sugarcane Price Dispute: ऊसाला ३५०० रुपये पहिली उचल द्या; स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर पैठणमधील साखर कारखाना बंद
Renukadevi Sugar Factory in Paithan Stops Crushing After Talks Fail Over Swabhimani Farmers Demand for 3500 Rupees Per Tonne

Renukadevi Sugar Factory in Paithan Stops Crushing After Talks Fail Over Swabhimani Farmers Demand for 3500 Rupees Per Tonne

esakal

Updated on: 

विहामांडवा : श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना, चौढाळा (ता. पैठण) येथे चालू गाळप हंगामातील ऊसदरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखाना प्रशासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवार, ता. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखाना परिसरात आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखाना प्रशासन यांच्यात ऊसदरासंदर्भात चर्चा झाली; मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गव्हाणीत जाऊन गाळप बंद करण्याची भूमिका घेतली. परिणामी कारखाना प्रशासनानेही कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...