

Ekturni Sheikh Family Protest At Paithan Tahsil Office Over Unjust Rejection Of Registered Partition Deed Mutation
esakal
-मुनाफ शेख
आडूळ: रजिस्टर वाटणीपत्राचा फेरफार आवश्यक कागदपत्रे सादर करूनही विनाकारण नामंजूर केल्याच्या निषेधार्थ एकतुनी येथील शेख यासीन शेख समसोद्दीन यांच्यासह कुटुंबीयांनी मंगळवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेपासून पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून फेरफार नामंजूर करण्यामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.