

Daylight House Burglary Shocks Thergaon Village
Sakal
पाचोड : भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा उघडून लोखंडी पेटीत ठेवलेले सासु - सुनेचे दोन तोळे सोने आणि वीस हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना थेरगाव (ता.पैठण) येथे घडली. यासंबंधी अधिक माहिती अशी, थेरगाव (ता.पैठण) येथील संभाजी भाऊसाहेब निर्मळ हे आपल्या कुंटुंबियासमवेत गावालगत घर करून राहतात. ते शेती करून आपल्या कुटुंबियाचा चरितार्थ चालवितात.