

Water Crisis Deepens: Adul Percolation Tank Hits Dead Storage Level
Sakal
आडूळ : पैठण तालुक्यातील आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून गावाच्या पाणीपुरवठ्याची प्रमुख मदार असलेल्या पाझर तलावात अवघा एक टक्का जलसाठा शिल्लक राहिला आहे. याच उरलेल्या पाण्यावर परिसरातील पशुपालक शेतकरी जनावरांची तहान भागवत आहेत. मात्र येत्या आठ दिवसांत हा साठाही संपण्याची भीती नागरिकांसह पशुपालकांनी व्यक्त केली आहे.