Sant Namdev Palkhi in Hingoli : हिंगोलीत रंगला रिंगण सोहळा; संत नामदेव महाराजांच्या पालखीचे स्वागत
Hingoli Welcomes Sant Namdev Palkhi : हिंगोलीतील नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या पालखीच्या पहिल्या रिंगण सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात झाले. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून सहभागी होत भक्तीमय वातावरण निर्माण केले.
हिंगोली : नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथील श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण मंगळवारी (ता. १७) येथे उत्साहात झाले. रामलीला मैदानावरील डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागा झाले होते.