

Palod Water Crisis Raises Questions Over Jal Jeevan Mission Quality as Khelna Dam Holds 80 Percent Water in Sillod
esakal
-राहुल पारवे
पालोद: गावागावांत घराघरांत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचा गाजावाजा करणाऱ्या जलजीवन मिशन योजनेची पालोद येथे मात्र दयनीय अवस्था असल्याचे चित्र समोर येत आहे. सुमारे ४० लाख रुपये खर्च करून २०२३ मध्ये उभारलेल्या योजनेनंतरही गावातील पाणीटंचाई कायम असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. मागील वर्षी खेळणा नदीतील पाइपलाइन वाहून गेल्यानंतर जुन्या पाइपलाइनच्या आधारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. मग लाखो रुपये खर्चून उभारलेली योजना नेमकी कोणाच्या उपयोगाची ठरली, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.