

Hingoli News
esakal
जवळा पांचाळ: कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि परिसरात काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे निसर्गाच्या लहरीपणाची भीती व्यक्त होत असली, तरी दुसरीकडे मात्र याच वातावरणात तीळ पीक जोमात आले आहे. सध्या शिवारात तीळ पीक बहरलेले असून, पांढऱ्या शुभ्र फुलांनी शेतशिवार फुलल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.