- धनंजय शेटे
भूम - 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष 2 रे' पंढरपुरच्या आषाढीवारीत या वर्षी 15 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरीत्या पार पाडत, आरोग्य विभागाने व आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी एक नवा इतिहास रचला आहे.
या महाआरोग्य शिबिराची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी पार पाडताना आरोग्य विभाग व डॉ. तानाजीराव सावंत हे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.