Pilgrim Saved: पंढरपूर वारीत हृदयविकाराचा झटका; मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे वारकऱ्याचे प्राण वाचले

पंढरपूर वारीत वारकऱ्याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपातून हेलिकॉप्टरद्वारे सोलापूरला हलवून वेळेवर उपचार; आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेमुळे मोठा अनर्थ टळला
According to officials, prompt medical response and administrative coordination helped ensure timely treatment, and the patient is reported to be in stable condition.

According to officials, prompt medical response and administrative coordination helped ensure timely treatment, and the patient is reported to be in stable condition.

Sakal

Updated on

चित्तेपिपंळगाव : पंढरपूर वारीदरम्यान छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसांवगी येथील वारकरी बाळू पडुळ यांना चालत असताना शुक्रवारी दुपारी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वारीच्या मार्गावर ही घटना घडताच उपस्थित वारकरी व आरोग्य पथकाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तात्काळ प्रशासनाला आवश्यक सूचना देत वारकऱ्याला तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com