गजानन महाराजांच्या पालखीने औंढानगरी दुमदुमली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन

गजानन महाराजांच्या पालखीने औंढानगरी दुमदुमली

औंढा नागनाथ : शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखीच्या आगमनाने औंढा नगरी शनिवारी (ता. १८) दुमदुमून गेली होती. वारकऱ्यांनी ‘आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची...ऐ भोळ्या शंकरा...’ असा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे सकाळी अकराच्या सुमारास औंढ्यात आगमन झाले.

पोलिस ठाणे, कासारगल्ली, रहीम चौक, जोशीगल्ली, नगरपंचायत रोड, डॉ. हेडगेवार चौक, स्व. मीनाताई ठाकरे चौकामार्गे ज्योर्तिलिंग श्री नागनाथ मंदिरामध्ये पालखीचे आगमन झाले. शहरात श्री संत गजानन महाराज यांची पालखी येत असताना नगरीतील सर्व भक्तगणांनी घरासमोर रांगोळ्या काढून दिंडीचे जंगी स्वागत केले. तसेच नायब तहसीलदार लता लाखाडे यांनी पालखीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. यावेळी माजी आमदार डॉ. संतोषराव टारफे, नगरपंचायत मुख्याधिकारी सचिन जयस्वाल, देवस्थानचे अधिक्षक वैजेनाथ पवार, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख यांनीही दर्शन घेतले. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांसाठी नंदकुमार पाटील यांनी भोजनाची व्यवस्था भक्त क्रमांक दोनमध्ये केली होती.

दिंडीतील सर्व भक्तगणांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पालखी दुपारी दोनच्या सुमारास जवळाबाजारकडे रवाना झाली. वारकऱ्यांसाठी गलंडीफाटा, पिंपळदरी फाटा, बंजारा कॉलनी, राम मंदिर, डॉ. हेडगेवार चौक, विशाल हॉटेल यासह ठिकठिकाणी चहा, पाण्याची सोय करण्यात आली होती.

डिग्रस पाटीवर पालखीचे स्वागत

हिंगोली : तालुक्यातील डिग्रस पाटीवर शनिवारी सकाळी पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर हिंगोली अर्बन ट्रस्टचे अध्यक्ष जयेश खर्जुले व रोहिणी खर्जुले यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर श्री खर्जुले व कुंडकर पिंपरी गावकऱ्यांच्या वतीने पालखीतील सहभागींच्या चहा, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी औंढा नागनाथकडे रवाना झाल्यावर भाविकांना पुरी, भाजीचे वाटप केले.

Web Title: Pandharpur Wari 2022 Gajanan Maharaj Palkhi In Aundha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top