
Prakash Solanke: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबरी मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. येत्या 7 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
बाबरी मुंडे यांनी भाजप सोडण्यामागचे कारण स्पष्ट करताना म्हटले, "स्थानिक पातळीवरील आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते आणि पक्ष लक्ष देत नाहीत. आम्ही पक्षासाठी खूप काम केले, संघर्षाच्या काळात पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो, पण तरीही जर न्याय मिळत नसेल तर पक्षात थांबून काय उपयोग?"