
आष्टी, (जि. बीड) - विधानसभा निवडणूक निकालानंतर आमदार सुरेश धस यांनी स्वपक्षीय नेत्या, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सुरू केले होते. धस यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी बोलावले होते तर पंकजा मुंडे यांना टाळले होते पण शासकीय कार्यक्रम म्हणून निर्धाराने त्या आल्या आणि त्यांनी केलेली टोलेबाजी चर्चेचा विषय ठरली. फडणवीस यांना बाहुबली म्हणणारे या भागातील लोक मला ‘शिवगामिनी’ म्हणतात. त्या अर्थाने मी देवेंद्र फडणवीस यांची माता आहे, या त्यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली.