टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे चौकशीची मागणी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे.

बीड: पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात महाविकास आघाडीच्या एका मंत्र्याचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता भाजप चांगलेच आक्रमक झाल्याचं मिळत आहे. आता याबद्दल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या प्रकरणाची सविस्तर तपास करण्यात यावा ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत या पुजा चव्हाणच्या आत्महत्येच्या तपासाची मागणी केली आहे. 'पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे' असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक खर्च सादर न केल्याने २०२ जणांना नोटीस

नेमके काय आहे प्रकरण? 
पुजा चव्हाण (वय २२) या तरुणीने गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. रुग्णालयात नेत असताना तिने जीव सोडला. तिचे विदर्भातील एका मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही नाव उघड केलेले नव्हते. आता भातखळकरांनी थेट 'राठोडगिरी' म्हणत मंत्री सेनेचा असल्याचे म्हटले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde demands inquiry into Puja Chavan death case