
Latest Beed News: बीड जिल्ह्याचं राजकारण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच धर्मसत्ता आणि राजसत्ता यांवरुन मागच्या काही दिवसांपासून रान पेटलेलं आहे. त्याचं कारण अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. शास्त्रींनी मुंडेंना भक्कम पाठिंबा दिल्याने वाद निर्माण झाला होता.