esakal | खोतकरांनी दिलेल्या ऑफरचे आभार : पंकजा मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

pankja munde and khotkar.png

पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर बुधवारी (ता.21) दिली होती. या ऑफर बद्दल पंकडा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्कच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

खोतकरांनी दिलेल्या ऑफरचे आभार : पंकजा मुंडे 

sakal_logo
By
दिलीप पवार

अंकुशनगर (जि.जालना) : एकनाथ खडसे यांना भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर बुधवारी (ता.21) दिली होती. या ऑफर बद्दल पंकडा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांचे आभार मानले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कविर्कच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे या औरंगाबाद येथून बीडकडे जात असताना वडीगोद्री येथे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी थांबल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी संवाद साधला. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या प्रसंगी पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेत येण्याची दिलेल्या ऑफरबद्दल बद्दल मी त्यांचे आभार मानते. माध्यमामधून मी ते ऐकले आहे. ओबीसी समाजाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. लोकांच्या अपेक्षा, पिडीत वंचितांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शेवटपर्यंत राहणार आहे. तसेच नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेले याचा मला धक्का बसला आहे. नाथाभाऊ पक्षसोडून जाणार नाहीत, असे मी वेळोवेळी स्टेटमेंट केले होते. याचा वेदना, खंत व खेद वाटतो अशी भावन भाजपाच्या ही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील दोदडगाव, गहिनीनाथनगर, वडीगोद्री, शहागड या ठिकाणी त्यांचे भाजप कार्यकर्ते व ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)