esakal | 'बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी'
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

'बीड-परळी-नगर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्राकडून 100 कोटींचा निधी'

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

बीड: अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामाला गती येणार आहे. यासाठी केंद्राने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रेल्वेमार्गाच्या कामाला या निधीमुळे गती येणार असल्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी ट्विट करून दिले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल (piyush goyal) यांचे मुंडे यांनी आभारही मानले आहेत. (nagar beed parli railway work)

मागील अनेक काळापासून रखडलेल्या या प्रकल्पाला शंभर कोटींच्या निधीनंतर गती येईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्यानेही या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामान्यांकडून होत आहे. हा मार्ग बीड आणि नगर जिल्ह्यासांठी खूप महत्त्वाचा आहे.

सध्या या नगर-परळी-बीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. केंद्राने यापुर्वी या मार्गासाठी 527 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यामधील 100 कोटींचा निधी मिळाल्याने या रेल्वे मार्गाच्या कामाला गती येणार आहे.

loading image
go to top