Pankaja Munde: "धनंजय मुंडेंचं योगदान ..."; लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Pankaja Munde: काल (बुधवार) भाजपने लोकसभेसाठी ७२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

Pankaja Munde: काल (बुधवार) भाजपने लोकसभेसाठी ७२ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० जागांवर भाजपने उमेदवार दिले आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत ही सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराची आहे. थोडी संमिश्र भावना यासाठी आहे कारण १० वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या. मी राज्याचं राजकारण करत होते. आता केंद्रात राजकारण करणार आहे. तसा प्रभारी म्हणून कामाचा अनुभव आला आहे. (Latest Marathi News)

मुंडे साहेब गेल्यानंतर डॉक्टरीपेशा सोडून प्रीतम राजकारणात आल्या, गेली १० वर्ष त्या संसदेत होत्या. आमच्या दोघींमध्ये समन्वय होता. प्रीतम मुंडेंना मी विस्तारीत करणार नाही. त्या शद्बावर मी कायम आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

नवीन अनुभवासाठी मी नेहमीच तयार आहे. राजकारण खडतर प्रवास आहे. आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Pankaja Munde
Anil Parab Sai Resort: अनिल परब यांना मोठा धक्का! साई रिसॉर्ट 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

उमेदवारी जाहीर झाली आता धनंजय मुंडे यांची भेट घेणार का? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, "माझे बंधू धनंजय हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि भाजप यांची राज्यात युती आहे. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. आमच्या युतीनंतर माझ्या मतदार संघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यानंतर मला लोकसभेची संधी मिळाली. त्यामुळे जेवढ्या मताने प्रीतमताई निवडून आली होती. त्यापेक्षा जास्त मताने मी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान असेन."

धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्त त्रास होणार नाही. धनंजय मुंडेंना परळीत सहकार्य करणार का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या,  त्यांनी सहकार्य कले तर त्यांना देखील सहकार्य मिळेल.

Pankaja Munde
Murlidhar Mohol: पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांचा सामना कुणाशी? महाविकास आघाडी देणार तगडं आव्हान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com